लढाऊ विमान एकटीनं उडवून 'अवनी चतुर्वेदीं'नी रचला इतिहास!

लढाऊ विमान एकटीनं उडवून 'अवनी चतुर्वेदीं'नी रचला इतिहास!

सोमवारी अवनीनं जामनगर वायूदल तळावरून मिग-21 बाइसन विमानाचं यशस्वीरीत्या उड्डाण केलं.

  • Share this:

22 फेब्रुवारी : फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी लढाऊ विमान एकटीनं उडवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. सोमवारी अवनीनं जामनगर वायूदल तळावरून मिग-21 बाइसन विमानाचं यशस्वीरीत्या उड्डाण केलं. अवनी यांच्या या उत्तुंग भरारीमुळे महिलांच्या माना अभिमानाने उंचवल्या आहेत.

जुलै 2016मध्ये अवनी यांनी फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाल्या होत्या. अवनी यांच्या या धाडसामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांच्या यशोगाथेला चार चाँद लागले असंच म्हणावं लागलं.

लढाऊ विमान उडण्यासाठीचं प्रशिक्षण अवनी चतुर्वेदींसह भावना कांत आणि मोहना सिंह यांनाही देण्यात आलं आहे. त्यामुळे या दोघीही नवा इतिहास रचतील यात काही वादच नाही.

First published: February 22, 2018, 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading