उत्तराखंड, 02 ऑक्टोबर: एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा हिमस्खलन (Avalanche in Uttarakhand)झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेत मुंबईतून (Mumbai) गिर्यारोहणासाठी गेलेले पाच जण बेपत्ता झाले आहे. माऊंट त्रिशूलवर (Mount Trishul) गिर्यारोहण करत असताना ही घटना घडली आहे.
उत्तराखंडमध्ये झालेल्या या हिमस्खलनात भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. हे 20 जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर जात होते. मात्र वाटेतच हा अपघात झाला. सध्या वेगानं शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशी नेहरू गिर्यारोहण संस्थेचे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन टीम उत्तरकाशीहून माऊंट त्रिशूलच्या दिशेनं रवाना झाली आहे.
हेही वाचा- 'ओ हसीना जुल्फोवाली...' Look वर फिदा क्रिकेटरची स्मृतीनं केली 'बोलती बंद'!
ही 20 जणांची टीम 7,120 मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती. कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या सीमेवर माऊंट त्रिशूल आहे. हेलिकॉप्टर, लष्कर, हवाई दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि ग्राउंड रेस्क्यू टीम सध्या शोध मोहिम राबवत आहे.
असे सांगितले जात आहे की शुक्रवारी सकाळी, टीम माऊंटसाठी पुढे निघाली आणि या दरम्यान जबरदस्त हिमस्खलन झालं. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य अमित बिष्ट म्हणाले की, ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली, ज्यात 10 नौदल गिर्यारोहक बेपत्ता आहेत.
हेही वाचा- अमेरिकेत कोरोना मृतांचा आकडा 7 लाखांवर, काय आहे भारतातील स्थिती?
गिर्यारोहण मोहिमेसाठी टीम मुंबईहून रवाना झाली होती
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 20 सदस्यांची टीमनं 3 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईहून मोहिमेला सुरुवात केली. सकाळी 10 जवान मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यासाठी पुढे गेले. पण वाटेत ते हिमस्खलनाचे बळी ठरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Uttarakhand