Motor Vehicle Act : सावधान! तुम्ही चप्पल घालून बाईक चालवता? भरावा लागेल इतका दंड

Motor Vehicle Act : सावधान! तुम्ही चप्पल घालून बाईक चालवता? भरावा लागेल इतका दंड

जर तुम्हाला पायात चपला घालून वाहन चालवण्याची सवय असेल तर ती वेळीच बदला. कारण ही सवय तुमचा खिसा रिकामा करू शकते

  • Share this:

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : देशभरात 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन मोटर वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई स्वरुपात मोठी रक्कम वसूल केली जात आहे. वाहन परवानाशिवाय गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. नियमांच्या या यादीत आणखी एका नियमाचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला पायात चपला घालून वाहन चालवण्याची सवय असेल तर ती वेळीच बदला. कारण ही सवयदेखील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या श्रेणीत येत असल्याचं म्हटलं जात आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण कारवाई होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारी घ्यायला हवी. तसंच ही सवय तुमचा खिसादेखील रिकामा करू शकते.

(वाचा : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर बिनधास्त करा VIDEO, तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार)

वाहतुकीच्या नियमानुसार चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्रवाशांची सुरक्षा पाहूनच हा नियम तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नियमानुसार स्लीपर किंवा चप्पल घालून गिअर असणारी बाईक चालवण्यास परवानगी नाही. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते, असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे.

दोन वेळा पकडले गेल्यास 15 दिवसांचा तुरुंगवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर किंवा चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. सोबत जर स्लीपरसहीत बाईक चालवताना तुम्ही दोन वेळा पकडले गेल्यास तुम्हाला 15 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागले.

(वाचा : कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल)

दहापट वाढवला दंड

वाहतुकीच्या नवीन नियमांनुसार दंडाच्या शुल्कात जवळपास दहापटीनं वाढ करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जर अल्पवयीन वाहन चालकाला गाडी चालवताना पकडलं गेलं तर संबंधित वाहन मालकाला कारवास भोगावा लागेल. भरधाव गाड्या चालवणाऱ्यांना 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल, यापूर्वी दंडाची रक्कम 400 रुपये एवढी होती.

(वाचा : स्मार्ट व्हा! गाडीची कागदपत्रे जवळ नसतील तरी बिनधास्त रहा, यामुळे होणार नाही दंड)

CCTV VIDEO: धक्कादायक! भरधाव कारनं 3 महिलांना चिरडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या