ऑस्ट्रेलियातल्या निवडणुकीत का चुकले सर्व Opinion Polls?

ऑस्ट्रेलियातल्या निवडणुकीत का चुकले सर्व Opinion Polls?

ऑस्ट्रेलियातल्या 5 न्यूज चॅनल्सनी तिथल्या निवडणुकीत केलेले सर्व्हे चुकीचे ठरले, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

  • Share this:

सिडनी 20 मे : भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकांचे एक्झिट पोल रविवारी जाहीर झाले. यातल्या बहुतांश पोलमध्ये भाजप आणि NDAला बहुमत मिळणार असं आढळून आलंय. त्यामुळे सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू झाली. सगळेच एक्झिट पोल हे खरे नसतात असं उदाहरण दिलं गेलं. गेल्याच आढवड्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुकीत सर्वच Opinion Polls चुकल्याचं उदाहरणही दिलं गेलंय. ऑस्ट्रेलियातल्या निकालांनी सर्वच तज्ज्ञांना धक्का दिलाय.

ऑस्ट्रेलियात गेल्या आढवड्यात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीआधी जे सर्व्हे घेण्यात आले होते त्या सर्वांमध्ये लेबर पक्षाला विजय मिळेल असं दाखविण्यात आलं होतं. तर विविध आघाडी असलेल्या पक्षाचा फारसा प्रभाव राहणार नाही असंही सांगण्यात आलं होतं.

मात्र जेव्हा निकाल बाहेर आले तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. निकालानंतर आघाडीला सत्ता मिळेल असं स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलियातल्या 5 न्यूज चॅनल्सनी हे सर्व्हे केले होते. ते सर्वच चुकल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. आत्तापर्यंत कधीच असं झालं नव्हतं यावेळी नेमकं काय घडलं त्याचा शोध घेणं आता सुरू झालंय.

स्कॉट मॉरिसन हे आता पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना 'अॅक्सिडंटल प्रायमिनिस्टर' असं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांनी सलग दुसऱ्यांना विजय खेचून आणल्याने त्यांना या विजयचे शिल्पकार असं म्हटलं जाऊ लागलं.

ऑस्ट्रेलियात मतदानाची सक्ती आहे. त्यामुळे मतदानाचं प्रमाण हे कायम राहातं. चुकीचे सॅम्पल निवडणं, सॅम्पलचं प्रमाण कमी ठेवणं, खोटी आकडेवारी, योग्य विश्लेषण न करणं, शास्त्रीय पद्धतीचा वापर न करणं आणि जी पद्धत वापरली त्यात चुकीची पद्धत अवलंबणं यामुळे हे सर्व्हे चुकल्याचं आता बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या