Home /News /national /

संपत्तीच्या वादातून एक वर्षाच्या निष्पाप मुलाची शौचालयाच्या टाकीत फेकून हत्या

संपत्तीच्या वादातून एक वर्षाच्या निष्पाप मुलाची शौचालयाच्या टाकीत फेकून हत्या

फोटो- मृत मुलाचे वडील घटनेची माहिती देताना

फोटो- मृत मुलाचे वडील घटनेची माहिती देताना

औरंगाबाद हादरलं! एक वर्षाच्या चिमुकल्याची संपत्तीच्या वादातून निर्घृण हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    औरंगाबाद, 17 डिसेंबर: एक वर्षाच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमधल्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील नवीननगर (Navinnagar) ब्लॉक परिसरातील चरण (Charan) गावांत हा प्रकार घडला. मृत मुलगा चरण येथील रहिवासी हरिओम सोनी (Hariom Soni) यांचा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिओम सोनी यांच्या वडिलांनी आपली संपत्ती पत्नीच्या नावावर केली होती. यामुळेहरिओम सोनीचा त्याच्या भावासोबत वाद सुरू होता. बुधवारी रात्री हरिओम सोनीची पत्नी आणि वहिनी यांच्यात वाद झाला होता. यानंतर रात्री हरिओम सोनी यांच्या एक वर्षाच्या लहान मुलाला कोणीतरी उचलून टॉयलेटच्या टाकीत टाकलं. आपला मुलगा सापडत नाही म्हणून मुलाच्या आईनं सगळं गाव पालथं घातलं, पण मुलगा काही सापडला नाही. त्यामुळं मुलाच्या आईची रडून रडून अवस्था वाईट झाली होती. सकाळी सकाळीच घरात लोकांची गर्दी जमू लागली, त्यानंतर जमलेल्या लोकांनी पुन्हा एकदा मुलाला शोधण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत असल्याचं आढळून आलं. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शौचालयाच्या टाकीमध्ये एकाला खाली उतरवले आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळं सर्व गावात हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माळी पोलीस स्टेशनचे प्रमुख रमेश कुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संपत्तीच्या वादातून या मुलाची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सर्व लोकांचे जाब नोंदवल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या