नवी दिल्ली, 05 एप्रिल : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये आता ख्रिश्चन मिश्चेलनं नवीन खुलासा केला आहे. ईडीनं केलेल्या चौकशीमध्ये ख्रिश्चन मिश्चेलनं काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचं नाव घेतलं असून त्याला लाच दिल्याचं म्हटलं आहे. चौकशीदरम्यान मिश्चेलनं AP अर्थात अहमद पटेल आणि FAM म्हणजेच फॅमिली अशी माहिती दिली आहे. चार्जशीटमध्ये मिश्चेलच्या पत्राचा हवाला देत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबाव टाकल्याचं देखील म्हटलं आहे. तसंच राजकीय व्यक्ति आणि एअरफोर्समधील अधिकाऱ्यांना लाच म्हणून 30 मिलियन डॉलर दिल्याचं देखील उल्लेख केला आहे. यापूर्वी देखील ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये मोठा खुलासा करण्यात आला होता. 2004 ते 2016 या काळात RG नामक व्यक्तिला 50 कोटींची लाच दिल्याचं म्हटलं आहे. पण, RG म्हणजे कोण? हे सांगण्यास मात्र ख्रिश्चन मिश्चेलनं नकार दिला आहे.
काय आहे प्रकरण
व्हिव्हिआयपी लोकांसाठी करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये हा घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणामध्ये आता ख्रिश्चन मिश्चेलची चौकशी सुरू आहे. युएईमधून त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. 53 कोटी डॉलरचं कंत्राट मिळण्यासाठी कंपनीनं भारतीय अधिकाऱ्यांना 100 - 125 कोटींची लाच दिली होती. या साऱ्या प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. 2010मध्ये 3 हजार 600 कोटी रूपयांचा हा करार करण्यात आला होता. पण, 2014मध्ये भारत सरकारनं हा करार रद्द केला होता. करार रद्द झाल्यानंतर 360 कोटी रूपये लाच दिल्याचा आरोपाखाली सध्या ख्रिश्चन मिश्चेलची चौकशी सुरू आहे. ख्रिश्चन मिश्चेलनं केलेल्या या खुलाशामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अजून वाढलं आहे. ईडी याचा सारा तपास करत आहे.
SPECIAL REPORT : 'त्या' वक्तव्यामुळे राजू शेट्टींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार