हैदराबाद, 29 जून : दारुच्या नशेत (Drunk) एका ऑडिचालकानं (Audi Car) रिक्षाला (Auto Rickshaw) जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना घडली हैद्राबादमधील सायबराबाद (Cyberabad) भागात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) हा प्रकार कैद झाला असून पोलीस त्याआधारे घटनेचा तपास करत आहेत.
हैद्राबादमधील सायबराबाद भागात मद्यधुंद अवस्थेत एक तरुण ऑडी चालवत रस्त्याने चालला होता. त्याच्या मेंदूवर दारूचा अंमल झाल्यामुळे गाडीच्या वेगाचा कुठलाही अंदाज त्याला नव्हता. अत्यंत वेगात गाडी चालवणाऱ्या या मद्यधुंद तरुणाला वाटेत असलेली रिक्षादेखील दिसली नाही. वाऱ्याच्या वेगानं चाललेल्या या ऑडिनं रिक्षाला अक्षरशः चिरडून टाकलं. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आणि या रिक्षात बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
असा झाला अपघात
सोमवारी पहाटे हा भीषण अपघात घडला. सायबराबाद भागात आयोजित करण्यात आलेल्या एका दारु पार्टीसाठी हजर असलेला हा तरुण पहाटेच्या सुमाराला ज्युबिली हिल्स परिसरातील त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रदेखील गाडीत होता. त्याचवेळी सायबराबादमधील इनऑर्बिट मॉलपाशी त्याची ऑडि पोहोचली असतानाच एक रिक्षा तिकडून चालली होती. त्यावेळी रिक्षाला ऑडिला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Reckless speed and drunk driving of an Audi car kills a passenger (an employee of Prism Pub !! ) in the auto yesterday early morning near Inorbit Mall. A case of culpable homicide not amounting to murder has been booked against the Audi driver and his associates.#RoadSafety pic.twitter.com/vhJfsiL9cS
— CYBERABAD TRAFFIC POLICE సైబరాబాద్ ట్రాఫిక్ పోలీస్ (@CYBTRAFFIC) June 29, 2021
या प्रकऱणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित, त्याचा मित्र आशिष आणि सुजितचे वडिल रघुनंदन रेड्डी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर हिट-अँड-रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदोष मनुष्यवधासह इतरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारूचा परिणाम
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना वेग आणि दिशा यांचं भान चालकाला राहत नसल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मद्याचा छोट्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे वेग आणि अंतर यांचा अंदाज बांधण्याची मेंदूची क्षमता क्षीण झालेली असते. त्यामुळेच अनेक अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचं सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.