दिल्ली, 16 ऑगस्ट: दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाबाहेर (Supreme court) एका महिलेसह पुरुषानं स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेनं आणि पुरुषानं सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक डी समोर स्वत: ला पेटवून (man and woman set themself on fire) घेतलं आहे. या गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीनं घेराव घालत आग आटोक्यात आणली आहे. दोघा जखमींना तातडीनं राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
जनसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित दोघांना गेट क्रमांक डीमधून सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करायचा होता. पण त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्यामुळं सुरक्षा रक्षकांनी त्यांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला नाही. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोरच स्वतःला पेटवून घेतलं आहे. दोघांनी पेटवून घेताच परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. गेटवरील उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कशी बशी आग आटोक्यात आणली. त्यानंतर दोघां जखमींना तातडीनं पोलिसांच्या वाहनातून राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा-'तालिबान आम्हाला जिवंत सोडणार नाही', अफगाणिस्तानहून भारतात आलेल्या महिलेचा टाहो
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एक पुरुष आणि महिला सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक डी वर आले. तेव्हा त्यांच्या हातात एक बाटली होती. त्या बाटलीत काही ज्वलनशील पदार्थ असल्याचा संशय आहे. पण त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Supreme court