पाटणा, 08 सप्टेंबर: एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीसोबत (Woman IPS Officer's minor daughter) कुकने विकृत कृत्य (attempt to rape by cook) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला अधिकारी कामानिमित्त बाहेर गेली असता, आरोपी कुकनं पीडित मुलीला रुममध्ये एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पाटणातील महिला पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे. पळून जाण्यापूर्वीच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Accused cook arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित संतापजनक घटना बिहार राज्याची राजधानी पाटणा याठिकाणी घडली आहे. येथील एक महिला IPS अधिकारी कामानिमित्त घराबाहेर गेली असता, घरातील कुकनं IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वेळीच मुलीनं विरोध केल्यानं आरोपी कुक घाबरला आणि तो रुममधून निघून गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू
संबंधित आरोपी कुक हा मागील बऱ्याच दिवसांपासून महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात काम करत आहे. त्यामुळे घरातील सर्वांचा त्याच्यावर विश्वास होता. तो अशाप्रकारचं विकृत कृत्य करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कुकवर विश्वास असल्यानं महिला IPS अधिकाऱ्यानं मंगळवारी आपल्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात एकटीला सोडून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
हेही वाचा-दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात; नराधमानं गाठला अमानुषतेचा कळस
दरम्यान पीडित मुलगी आपल्या रुममध्ये अभ्यास करत असताना, आरोपी कुक तिच्या रुममध्ये गेला. यानंतर त्यानं मुलीचे पाय दाबण्याचा बहाणा करत मुलीसोबत विकृत कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागला. पण तिच्यासोबत घडणारा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीनं हिम्मत दाखवून आरोपीचा विरोध केला. यानंतर आरोपी पीडितेच्या रुममधून निघून गेला. या संतापजनक घटनेनंतर पीडितेनं आपल्या आईला फोन करून या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा-पुणे हादरलं! बहिणीसोबत केलेल्या विकृत कृत्याचा भावानं घेतला फिल्मी स्टाइल बदला
त्यानंतर महिला IPS अधिकाऱ्यानं फोन करत या घटनेची माहिती महिला पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं घरं गाठलं आणि आणि आरोपी कुक बच्चा कुमार (वय-50) याला ताब्यात घेतलं. महिला अधिकारी कामावरून परत आल्यानंतर, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराचा प्रयत्न या गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेचा चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.