Home /News /national /

माओवाद्यांचा धुमाकूळ; घनदाट जंगलात तासभर अडवली प्रवासी रेल्वे, अपघात घडवण्याचाही प्रयत्न

माओवाद्यांचा धुमाकूळ; घनदाट जंगलात तासभर अडवली प्रवासी रेल्वे, अपघात घडवण्याचाही प्रयत्न

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी (Chhattisgarh Maoist attack news) आता प्रवासी रेल्वेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे रुळांवर सिमेंट ब्लॉक, दगड टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला.

दंतेवाडा, 24 एप्रिल : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी (Chhattisgarh Maoist attack news) आता प्रवासी रेल्वेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे रुळांवर सिमेंट ब्लॉक, दगड टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला. दंतेवाडा (Dantewada) ते बचेली दरम्यान नेरली पुलाजवळ रेल्वे रुळाला माओवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशाखापट्टणमहून किरंदूलकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचा (Passenger Railway) यामुळे मोठा अपघात झाला असता. मात्र, लोको पायलटने योग्य वेळी ब्रेक लावले. ज्यामुळे अपघात झाला नाही आणि सुदैवाने मोठा अपघात टळला. यानंतर सशस्त्र माओवाद्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश करत उपस्थित प्रवाशांच्या हातात पोस्टरं दिली. येत्या 26 एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन पत्रकांमधून करण्यात आले आहे. हे वाचा - कोरोनाबाधित बापाचं अमानुष कृत्य, छातीवर चढून घेतला 9 वर्षाच्या मुलाचा जीव जवळपास एक तास घनदाट जंगलात रेल्वेमध्ये गोंधळ घालून नंतर माओवादी निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना त्यंच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले. या जागेवर पूर्वीही अनेकदा माओवाद्यांनी मालवाहतूक रेल्वे रुळावरून घसरवली आहे. मात्र, पहिल्यांदाच माओवाद्यांनी प्रवासी रेल्वेला या मार्गावरून उतरवण्याचा प्रयत्न करत लक्ष्य केले आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Naxal Attack, Railway accident, Railway track

पुढील बातम्या