काश्मीरमध्ये हल्ला चढवून तो भाग ताब्यात घ्यावा, रामदेव बाबांचा सरकारला सल्ला

काश्मीरमध्ये हल्ला चढवून तो भाग ताब्यात घ्यावा, रामदेव बाबांचा सरकारला सल्ला

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवून तो भाग ताब्यात घ्यावा, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी सरकारला दिला आहे.

  • Share this:

13 मे : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवून तो भाग ताब्यात घ्यावा, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी सरकारला दिला आहे. बिहारमधील गया इथे आयोजित एका योग शिबिरात ते बोलत होते.

२००८ मध्ये भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिल्यानंतर रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. यावर उपाय म्हणून भारतानं पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून तो भाग आपल्या ताब्यात घ्यावा. याशिवाय भारतानं बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी दिली होती. पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन असल्याचा जगभरातून होत असलेला आरोप नेहमीच धुडकावून लावणाऱ्या पाकिस्तानची शरीफ यांच्या कबुलीमुळं नाचक्की झाली होती.

 

First published: May 13, 2018, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading