मराठी बातम्या /बातम्या /देश /

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला; धक्कादायक VIDEO आला समोर

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला; धक्कादायक VIDEO आला समोर

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर अनेक जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ल्याचा एक VIDEO समोर आला आहे.

    कोलकाता, 6 मे : पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कथित स्वरुपात हिंसेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि भाजप पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहता आणि घटनास्थळावर तपास करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून चार सदस्यील दलाचं गठन करण्यात आलं आहे. यासर्वात आता केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन (V Muraleedharan) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आरोप लावला आहे की, तृणमूल काँग्रेच्या गुंंडांनी जमावावर हल्ला केला. व्ही मुरलीधरन पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात होते. सांगितलं जात आहे की, केजीटी ग्रामीण विधानसभेतील पंचखुडी भागात त्यांच्या जमावार हल्ला करण्यात आला. हल्ल्यादरम्यान त्यांच्या गाडीच्या काचा तोडण्यात आल्या होत्या. केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी जमावावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, पश्चिमी मदिनापूरच्या दौऱ्यादरम्यान माझ्या गाडीवर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केला. गाडीच्या काचा तोडला. माझ्या पर्सनल स्टाफवर देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे मला दौरा मध्यातच सोडून परतावं लागलं. हे ही वाचा-ना पेन्शन घेत, नाही CM चा पगार; मग कसं चालतं ममता दीदींचा खर्च, स्वत:च सांगितलं केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये काही लोक त्यांच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, त्यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर ड्रायव्हर गाडी मागे फिरवतो. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, जे लोक जमावावर हल्ला करीत आहे, त्यांनी टीएमसीचे झेंडे-बॅनर घेतले आहे. हल्ल्यादरम्यान गाडीच्या काचा तुटल्या आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: TMC, West bangal

    पुढील बातम्या