केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या पत्नीची लूटमारीचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या पत्नीची लूटमारीचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांच्या पत्नीची लूटमार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

पाटणा, 16 एप्रिल: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांच्या पत्नीची लूटमार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहारची राजधानी पाटण्यात हा प्रकार झाला असून केंद्रीय मंत्री प्रसाद यांच्या पत्नी या घटनेतून थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पाटण्यातील पाटलीपुत्र परिसरात रवीशंकर यांच्या पत्नी माया शंकर सरकारी गाडीने प्रवास करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी गाडी लुटण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला माया यांनी विरोध केला. त्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत माया शंकर थोडक्यात बचावल्याचे समजते.

संबंधित घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीवर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर तेथे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा सवाल आता विचारला जात आहे.

VIDEO : विश्वास न बसणारी घटना, तब्बल 220 km समुद्रात पोहत गेला हा कुत्रा!

First published: April 16, 2019, 10:37 PM IST

ताज्या बातम्या