मणिपूरमध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीवर हल्ला; 3 जवान शहीद, 4 जणं गंभीर

मणिपूरमध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीवर हल्ला; 3 जवान शहीद, 4 जणं गंभीर

दहशतवाद्यांनी घातपात करीत हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

इंफाल, 30 जुलै : देशभरात कोरोनाचं संकट असताना भारतातील उत्तर पूर्व भागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहेमणिपूरमध्ये (Chandel Manipur)  भारतीय सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले आहेत. शिवाय 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार म्यानमारच्या सीमेजवळील चंदेलमध्ये स्थानिक समूह पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी घात करीत केलेल्या हल्ल्यात 4 आसाम राइफल्स यूनिटचे  ( 4 Assam Rifles unit)  3 कर्मचाऱी शहीद झाले आहेत. या हल्ल्यात 4 जणं गंभीर जखमी झाले आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पहिल्यांदा IED चा स्फोट केला आणि सैनिकांवर गोळीबार केला. इम्फालपासून 100 किमी परिसरात इंफोर्समेंट पाठविण्यात आली आहे. सांगितले जात आहे की गंभीर सैनिकांना इम्फाल पश्चिम जिल्हा स्थित मिलेट्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाचा- सावधान! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय हृदयाचा आजार-रिसर्च

आतापर्यंत इतकीच माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती कळताच बातमी अपडेट केली जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: July 30, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading