नवी दिल्ली, 18 जून : रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले काही नवीन नाहीत. यापूर्वी डॉक्टरांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये देखील अशा घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये देखील डॉक्टरांवर हल्ला झाला. त्यानंतर डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला देशभरातून पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानमधून देखील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा मिळाला. त्यानंतर डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेत कठोर कायदा करण्याची मागणी केली. शिवाय, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील हर्षवर्धन यांना पत्र लिहत कठोर कायद्याची मागणी केली. आता सरकार देखील याबाबत गांभीर्यानं विचार करत आहे. यापुढे डॉक्टरांवर हल्ला झाल्यास 10 वर्षाची तुरूंगवारी आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. असा कायदा करण्याबाबत सरकार आता गांभीर्यानं विचार करत आहे.
प्रस्तावित कायदा
मेडिकल सर्विस पर्सन आणि मेडिकल सर्विस इंस्टीट्यूशन अधिनियम 2017 या कायद्यांतर्गत डॉक्टरांवर हल्ला झाल्यास 10 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रूपयापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर त्याला देशव्यापी पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे रूग्णांचे देखील हाल झाले होते. तर, डॉक्टरांनी हेल्मेट घालून देखील आपला निषेध अनोख्या पद्धतीनं नोंदवला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना अल्टिमेटम दिला होता. पण, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष करत ममता बॅनर्जी धमकावत असल्याचा आरोप केला होता. तर, ममता बॅनर्जींनी देखील डॉक्टरांच्या संपाला भाजपची फूस असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या संपादरम्यान राजकीय आरोप - प्रत्यारोप झाल्याचं देखील दिसून येत आहे.
रेल्वेचं रडगाणं आणि मुंबईकरांचा संताप, पाहा SPECIAL REPORT