ATSची मोठी कारवाई; 'जैश'सोबत संबंध असल्याच्या संशयावरून 12 ताब्यात

उत्तर प्रदेशमध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 01:36 PM IST

ATSची मोठी कारवाई; 'जैश'सोबत संबंध असल्याच्या संशयावरून 12 ताब्यात

सहारनपूर, 22 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर आता एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसनं 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सहारनपूरमधील एका खासगी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एटीएसनं ही कारवाई केली आहे. देवबंदमध्ये देखील एटीएसनं छापा मारत काही जणांना ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एटीएसनं जैश - ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पैसे पुरवणाऱ्या शहानवाज आणि आकिफ अहमद मलिकला ताब्यात घेतलं आहे. शहानवाज  हा मूळचा काश्मीरमधील कुलगामचा तर आकिफ हा पुलवामाचा रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी 2 काश्मीरच्या तर 5 ओडिसासह इतर राज्यातील काही विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशात सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. शिवाय, देशात मोठा हल्ला होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संशयितांवर एटीएसची नजर होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मोठ्या हल्ल्याच्या तयारीत दहशतवादी

पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केल्यानंतर आता दहशतवादी पुन्हा एकदा भारतीय सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहेत. जैश - ए - मोहम्मह ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. दहशतवाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जैश - ए - मोहम्मद पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत आहे. गुरूवारी 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर देशातील प्रमुख भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात होता.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार जैश - ए - मोहम्मदनं 500 किलो स्फोटकं या हल्ल्यासाठी तयार ठेवली आहेत. शिवाय, आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरली जाणारी गाडी देखील तयार ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू - काश्मीर किंवा बाहेर देखील हा हल्ला केला जाऊ शकतो. या संभाव्य हल्ल्याबद्दल लष्कराला सतर्क करण्यात आलं आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

लोकलवर हल्ल्लाची शक्यता

दरम्यान, दहशतवादी मुंबई लोकलला देखील लक्ष्य करू शकतात अशी शक्यता देखील गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...