आज एटीएमचा 50वा वाढदिवस!

आज एटीएमचा 50वा वाढदिवस!

बार्कलेज बँकेने उत्तर लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधल्या त्यांच्या शाखेत २७ जून १९६७ रोजी पहिलं एटीएम मशिन बसवलं होतं.

  • Share this:

27 जून : २७ जून हा दिवस जागतिक पातळीवर लक्षणीय दिवस आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आटोमॅटिक टेल्लर मशिन म्हणजेच एटीएमला आज पन्नास वर्षे पूर्ण होतायत.

बार्कलेज बँकेने उत्तर लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधल्या त्यांच्या शाखेत २७ जून १९६७ रोजी पहिलं एटीएम मशिन बसवलं होतं. त्यावेळी कार्ड नव्हतं. बँकेच्या कॅशियरने लिहून दिलेली चिठ्ठी वाचून हे मशिन पैसे देत असे.

आज जगभरात ३० लाखांहून अधिक एटीएम मशीन कार्यरत आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आणि लक्झरी क्रुझ बोटीपासून युद्धनौकेपर्यंत म्हणजेच जगातील प्रत्येक 3000 लोकांमागे एक मशीन अशी सरासरी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 02:34 PM IST

ताज्या बातम्या