अटल बिहारी वाजपेयीं यांची नात डॉ. पूजा शुक्ला भोपाळमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या खालावत चाललेल्या तब्येतीची माहिती मिळताच भोपाळमध्ये राहणाऱ्या पूजा शुक्ला ढसाढसा रडू लागल्या. पती आणि मुलासह पूजा भोपाळ येथील टीटी नगर परिसरात राहतात. न्यूज १८ चे प्रतिनिधी मनोज राठोर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.