S M L

अटलजींची प्रकृती स्थिर, इन्फेक्शन दूर होईपर्यंत उपचार सुरू राहणार

इन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयी यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटिन काही वेळापूर्वी डॉक्टरांनी प्रसिद्ध केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 12, 2018 02:20 PM IST

अटलजींची प्रकृती स्थिर, इन्फेक्शन दूर होईपर्यंत उपचार सुरू राहणार

नवी दिल्ली, 10 जून : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे.  ते उपचारांना प्रतिसादही देतायेत. मात्र इन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयी यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटिन काही वेळापूर्वी डॉक्टरांनी प्रसिद्ध केलंय. त्यात वाजपेयी यांना सध्या इन्फेक्शन दूर होण्यासाठी अँटीबायोटीक्स देण्यात येत असल्याचंही स्पष्ट केलं.

डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली वाजपेयी यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.डॉ. गुलेरिया हे एम्सचे संचालक आहेत आणि ते वाजपेयांचे फॅमिली डॉक्टरही आहेत. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी काही वेळापूर्वी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 02:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close