माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : आदर्शपुरूष, कवी, राजकारणातले युगपुरुष भारतरत्न  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी 5.50 वाजता दिल्लीतील राजघाटाजवळील स्मृतीस्थळावर अटलजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानस मुलगी नमिता भट्टाचार्य हीने अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ गोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, तीनही दलाचे सैन्यप्रमुख आणि इतर मान्यवरांच्या  उपस्थितीत अटलजींना अखेरचा निरोप देण्यात आला.

आज  दुपारी 2 वाजतेच्या सुमारास  अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव भाजप कार्यलयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले. आपल्या आवडत्या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. पण या सगळ्यात आपल्या सुरक्षेची तमा न बाळगता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे भाजप कार्यालयापासून राजघाटापर्यंत पायी चालत सहभागी झाले होते. त्यांच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. आज दुपारी ४ वाजता वाजपेयींच्या सुमारास त्यांचं पार्थिव दिल्लीतील राजघाटाजवळील स्मृतीस्थळावर आणण्यात आलं.

संध्याकाळी 4 वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृतीस्थळी देशासह राज्यातले सर्व प्रमुख नेते वाजपेयींना निरोप देण्यासाठी हजर होते. सैन्याच्या तिनही प्रमुखांनी पुष्पचक्र वाहून अटलजींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलजींच्या चितेला मुखाग्नी दिला.

नमिता भट्टाचार्य यांनी जेव्हा अग्नी दिला तेव्हा सगळेच नेते, उपस्थित हात जोडून उभे राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते.

PHOTO: वाजपेयींच्या निधनानंतर पूनम महाजनांना आली वडिलांची आठवण, शेअर केला हा भावूक फोटो

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. अटलजींच्या निधनाने देशभर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने आजारी होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते.

 

VIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2018 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading