संसदेत अटलजींच्या छायाचित्राचं अनावरण, आझादांचा मोदींवर निशाणा

संसदेत अटलजींच्या छायाचित्राचं अनावरण, आझादांचा मोदींवर निशाणा

'50 वर्षात काहीच झालं नाही असं मी कधीच म्हणार नाही. असं म्हणणं म्हणजे, हा झालेल्या विकासाचा अपमान करण्यासारखं आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस ठरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठणवणींचा. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अटलजींच्या पूर्णाकृती तैलचित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्यसभेचे विरोधीपक्षनेते गुलामनबी आझाद यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरलं. आझाद यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

आझाद म्हणाले, " आजच्या राजकीय वातावरणात अटल बिहारी वाजपेयींची आठवण सर्वांना येते. त्यांनी विरोधी पक्षात असताना आणि सत्तेत असतानाही कठोर टीका केली मात्र कधीच अपमानास्पद भाषा वापरली नाही. संसदेत भाषण करताना त्यांनी म्हटलं होतं की 50 वर्षात काहीच झालं नाही असं मी कधीच म्हणार नाही. असं म्हणणं म्हणजे, हा झालेल्या विकासाचा अपमान करण्यासारखं आहे. धर्माच्या आधारावर त्यांनी कधीच मतांचं ध्रुविकरण केलं नाही."

गेल्या 50 वर्षात काहीच झालं नाही अशी टीका पंतप्रधान मोदी काँग्रेसवर कायम करत असतात. त्यामुळे अटलजींचे वाक्य वापरुन त्यांनी मोदींना सुनावल्याची चर्चा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींबद्दल बोलताना त्यांनी कधीच कुणाबद्दल अपमानास्पद भाषा वापरली नाही असं सांगितलं. वाजपेयींचा हा गुण नव्या पिढीने अंगिकारला पाहिजे असंही ते म्हणाले. दिल्लीतले चित्रकार कृष्ण कन्हाई यांनी वाजपेयींचं हे चित्र काढलं आहे.

First Published: Feb 12, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading