Home /News /national /

60 व्या वर्षी सासू-सासऱ्यांचं जावयाने लावलं लग्न; प्रेमाच्या 40 वर्षांनी घेतल्या सप्तपदी

60 व्या वर्षी सासू-सासऱ्यांचं जावयाने लावलं लग्न; प्रेमाच्या 40 वर्षांनी घेतल्या सप्तपदी

खरं प्रेम असेल तर त्याला कोणीच बंधन घालू शकत नाही.

    जयपूर, 20 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) बासवाडामध्ये प्रेम विवाह करण्यासाठी 40 वर्षांनंतर दाम्पत्याने सप्तपदी घेतल्या आणि एकमेकांना हार घातला. सर्व विधींसह 60 वर्षांच्या नवरा-नवरीने लग्न केलं. समाजाचा विरोध असल्या कारणाने याआधी दोघांचं हिंदू पद्धतीनुसार लग्न झालं नव्हतं. मात्र त्यांचा जावई आणि मुलीची इच्छा होती की, वृद्ध दाम्पत्यांनी थाटामाटात सर्व विधींसह विवाह करावा. म्हणून वयाच्या शेवटच्या टप्प्यात दोघांनी समाजाच्या समोर पुन्हा विवाह केला. (At the age of 60 the in laws got married) मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 40 वर्षांपूर्वी रूपगडचे वडलीपाडा निवासी बाबू (60) यांना तलाईपाडा निवासी कांता (60) हिच्यावर प्रेम जडलं होतं. दोघं एकमेकांना पसंत होते. त्यावेळी प्रेम विवाह समाजात स्वीकार्ह नव्हता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. मात्र तरी दोघांनी प्रेम विवाह (Love Marriage) केला आणि ते एकत्र राहू लागले. यामुळे त्यांना कुटुंबीय आणि समाजाचा विरोध सहन करावा लागला. त्यामुळे विधीवत त्यांना लग्न करता आलं नव्हतं. हे ही वाचा-भारतातील असं गाव जिथं प्रत्येक पुरुष करतो 2 लग्न; बहिणीसारख्या नांदतात सवती आपल्या लग्नाला समाज मान्यता मिळाली नसल्याचं दु:ख दोघांनाही सलज होतं. त्यांची मुलगी आणि जावयाला हे लक्षात आलं. आणि दोघांनी दाम्पत्याचं विधीवत लग्न करण्याचं ठरवलं. यानुसार बुधवारी बाबू आणि कांताने विधीवत सप्तपदी घेतल्या. या लग्नात 100 वऱ्हाडी सामील झाले होते. यावेळी विवाहिताने आपल्या कुटुंबालाही बोलावलं. बाबू आणि कांता यांना एकच मुलगी आहे. सीमाचं लग्न राजूसोबत झालं असून मुलगी आणि जावयामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Love story, Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या