त्या क्षणाने केला घात; पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी करीत होती प्रार्थना...आणि तो मोजत होता शेवटच्या घटका

पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होती, तोच पतीला त्या अवस्थेत पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली

पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होती, तोच पतीला त्या अवस्थेत पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली

  • Share this:
    झांसी, 5 नोव्हेंबर : करवा चौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या दिवशी दिवसभर पूजा-अर्चा करुन पतीवरील सर्व संकट दूर होऊन त्याला सुखी व समाधानी आयुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करते. मात्र झांसीमधील एका दाम्पत्यासाठी या दिवसामुळे अख्ख आयुष्य बदललं. झांसीमधील पलरा गावात करवा चौथच्या दिवशी एका तरुणाने आत्महत्या केली. त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं. घरात पत्नी पूजेचे तयारी करीत होती. पतीच्या मृत्यूच्या बातमीमुळे तिच्यावर मोठा आघात झाला आहे. करवा चौथच्या दिवशी कुटुंबातील लोक शेतात गेले होते. घरात सचिनसोबत (25) त्याची पत्नी संगीता आणि आई होती. दुपारी 12 वाजता सचिनने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत फाशी लावून आत्महत्या केली. त्याची पत्नी घरात पहिल्या मजल्यावर करवा चौथच्या पूजेची तयारी करीत होती. बराच वेळ सचिन खाली आला नाही म्हणून पत्नी चिंतेत आली. तिने वर जाऊन पाहिलं तर सचिन फासावर लटकत होता. ते पाहताच ती स्तब्ध झाली. यानंतर शेजारील लोक सचिनच्या घरात जमा झाले. शेजाऱ्यांनी त्याला खाली उतरवलं व रुग्णालयात घेऊन गेले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नाहीत. हे ही वाचा-बॅगेत सापडलं 5 महिन्यांचं बाळ; बापाची भावुक चिठ्ठी वाचून ह्रदय पिळवटून निघेल पोलीस सुदीप सिंहने सांगितले की, सचिनच्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर सर्व जबाबदारी त्याच्यावर आली होती. तो एकूलता एक मुलगा होता. तो शेतीव्यतिरिक्त दुसरं काम करीत नव्हता. यामुळे त्याच्या पत्नीसोबत कायम वाद होत होता. करवा चौथच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी घरात तपास केला. त्यांचं म्हणणं आहे की, कुटुंबातील कलहामुळे सचिनने आत्महत्या केली. सचिनला सहा महिन्यांचा मुलगाही आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: