• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • काॅफी विथ मोदी, पंतप्रधानांनी रस्त्यावरच घेतला काॅफीचा आस्वाद

काॅफी विथ मोदी, पंतप्रधानांनी रस्त्यावरच घेतला काॅफीचा आस्वाद

पंतप्रधान मोदी अचानक सिमल्याच्या बाजारपेठेतल्या प्रसिद्ध मॉल रोडवरच्या इंडियन कॉफी हाऊस इथे थांबले. लोकसभा निवडणुकांच्या वेळी चाय पे चर्चा करून लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या मोदी यांना थंड वातावरणात गरमागरम कॉफी पिण्याचा मोह आवरता आला नाही.

  • Share this:
सिमला, 28 डिसेंबर : मस्त थंडी पडलीय. आणि या थंडीत काॅफीचा आस्वाद घ्यायचा आनंद काही औरच. याचा मोह आपल्या पंतप्रधानांनाही आवरला नाही. सिमला इथे भाजपाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहून परतत असताना पंतप्रधान मोदी अचानक सिमल्याच्या बाजारपेठेतल्या प्रसिद्ध मॉल रोडवरच्या इंडियन कॉफी हाऊस इथे थांबले. लोकसभा निवडणुकांच्या वेळी चाय पे चर्चा करून लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या मोदी यांना थंड वातावरणात गरमागरम कॉफी पिण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी लोकांची खूप गर्दी झाली होती. प्रचंड गर्दीमुळे मोदी यांना दुकानात जाऊन कॉफी पिणं शक्य नव्हतं. त्यामुळे रस्त्यावर उभं राहूनच मोदी यांनी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला. साधारण २० वर्षांपूर्वी पक्षाच्या कामाला सिमला इथे आले असता मोदी यांनी याच हॉटेलमधे कॉफी प्यायली होती. यानंतर मोदी यांनी ट्विटरवर इथे कॉफी प्यायल्याची आठवण लिहीलीय.
First published: