लखनौच्या रस्त्यावर अवतरली दुर्गा, हल्लेखोरांवर गोळ्या झाडून नवऱ्याला वाचवलं

लखनौच्या रस्त्यावर अवतरली दुर्गा, हल्लेखोरांवर गोळ्या झाडून नवऱ्याला वाचवलं

4 फेब्रुवारीला एक माणूस आपल्या घराबाहेर उभा होता त्यावेळी त्याच्यावर काही लोकांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.यावेळी घराच्या आत असलेली त्याची बायको त्याच्या मदतीला धावून आली

  • Share this:

लखनौ, 05 फेब्रुवारी : स्त्री जेव्हा रुद्रावतार घेते तेव्हा ती काहीही करू शकते, याचा प्रत्यय लखनौच्या काकोरी जिल्ह्यात आला. 4 फेब्रुवारीला एक माणूस आपल्या घराबाहेर उभा होता त्यावेळी त्याच्यावर काही लोकांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.यावेळी घराच्या आत असलेली त्याची बायको त्याच्या मदतीला धावून आली आणि तिने घरात असलेली बंदूक हल्ला करणाऱ्यांवर रोखली आणि गोळी देखील चालवली.

गोळी चालवताच हल्लेखोर तेथून पसार झाले. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नवऱ्यावर हल्ला करणाऱ्यांना बायकोने पळवून लावलंय, हल्लेखोरांवर बंदूक रोखली, गोळी देखील चालवली.

सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय. आपल्या नवऱ्याला वाचवणाऱ्या बायकोचं कौतुक होतंय.

First published: February 5, 2018, 2:33 PM IST

ताज्या बातम्या