न्यूझीलंड : मशिदीतील गोळीबारात 5 भारतीय ठार

न्यूझीलंड : मशिदीतील गोळीबारात 5 भारतीय ठार

न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या गोळीबारात एकूण 50 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

वेलिंग्टन, 17 मार्च : न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदीमध्ये झालेल्या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 5 भारतीय नागरिकांचा समावेश असून ही संख्या 7 पर्यंत पोहचू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांमध्ये एकजण हैदराबादचा असून २ जण गुजरातचे आणि एक व्यक्ती तेलंगणातील आहे. या हल्ल्यात पाकिस्तान आणि बांगलादेशमधील प्रत्येकी दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

न्यूझीलंडमधील मशिदीत अंदाधुंद गोळीबाराच्या दोन दिवसानंतर उच्चायुक्तालयाने 5 भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर फरहाज एहसानचा या गोळीबारात मृत्यू झाला. फरहाज एहसान हा गेल्या 7 वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये काम करत होता. तो त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत राहत होता.

गुजरातमधील बाप-लेकासह अहमदाबादच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील मोहम्मद इम्रान खान याचा मृत्यू यात झाला आहे.

न्यूझीलंडमध्ये 15 मार्चला दोन मशिदींमध्ये 28 वर्षीट ब्रेटन टैरेंट नाव्याच्या तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी मशिदीत नमाजसाठी लोकांची गर्दी झालेली होती. बांगलादेशचा क्रिकेट संघही या मशिदीत होता. हल्लेखोराने हल्ल्याचे फेसबुक लाइव्ह केले. त्याआधी त्याने त्याची इच्छा 74 पानी जाहीरनाम्यातून व्यक्त केली होती.

दरम्यान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला. 16 मार्चला ओव्हलवर तिसरी कसोटी खेळण्यात येणार होती. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिळून हा निर्णय घेतला आहे.

VIDEO : न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार, जीव मुठीत घेऊन धावले बांगलादेशचे क्रिकेटर

First published: March 17, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading