नवरात्रीत गुरुग्राममधली मटनाची दुकानं बंद ठेवा,सेनेचा फतवा

नवलोत्सवातल्या पहिल्या दिवशी गुरुग्राममधली ५००पेक्षा जास्त दुकानं शिवसेनेनं जबरदस्तीनं बंद पाडली आहेत. संपूर्ण नवलोत्सवात मांसविक्रीची दुकानं बंद राहावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १९ सप्टेंबरला शिवसेनेनं पत्र दिलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2017 01:51 PM IST

नवरात्रीत गुरुग्राममधली मटनाची दुकानं बंद ठेवा,सेनेचा फतवा

22 सप्टेंबर : नवलोत्सवात गुरुग्राममधली मटन विकणारी दुकानं कथित शिवसैनिकांनी बंद करायला लावली आहेत. नवलोत्सव सुरू असेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा फतवा कथित शिवसैनिकांनी काढलाय. गुरुग्राममधली पन्नास टक्के दुकानं आधीच बंद आहेत. आणि जी दुकानं सुरू आहेत ती दुकानं बंद करायला शिवसेनेकडून सांगण्यात आलंय.

नवलोत्सवातल्या पहिल्या दिवशी गुरुग्राममधली ५००पेक्षा जास्त दुकानं शिवसेनेनं जबरदस्तीनं बंद पाडली आहेत. संपूर्ण नवलोत्सवात मांसविक्रीची दुकानं बंद राहावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १९ सप्टेंबरला शिवसेनेनं पत्र दिलंय.

गेल्या वर्षीसुद्धा शिवसेनेनं नवलोत्सवात मांसविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पर्युषण काळात महाराष्ट्रात मांसविक्रीवर बंदी घालण्याचा विरोध करणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा यानिमित्तानं उघड झालाय.

पण शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितलंय की ही दुकानं बंद पाडणारे शिवसैनिक नव्हतेच.

Loading...

>>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...