CMच्या कार्यक्रमात दीड वर्षांच्या बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल ड्यूटीवर

CMच्या कार्यक्रमात दीड वर्षांच्या बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल ड्यूटीवर

या महिलेची कामाप्रती निष्ठा बघून समाज माध्यमांवर तिचं कौतुक केलं जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : महिला आपली जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने उचलतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमात समोर आली. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी रविवारी आणि सोमवारी दोन दिवस नोएडाच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान नोएडा येथील त्यांच्या कार्यक्रमात महिला पोलीस ड्यूटीवर होती. आपल्या दीड वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन ती तेथे पोहोचली. कॉन्स्टेबर प्रीती रानीदेखील मुख्यमंत्री योगींच्या कार्यक्रमातील तैनात पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक होती. आपल्या दीड वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन प्रीती म्हणाली, 'याच्या वडिलांची आज परीक्षा होती. त्यामुळे मी बाळाला घरी ठेवू शकले नाही, कारण त्याचा सांभाळ करायला कोणी नव्हतं. यासाठी बाळाला इथं घेऊन यावं लागलं. सोमवारी प्रीती सकाळी 6 वाजल्यापासून VVIP ड्यूटीवर होती. प्रीती यावेळी म्हणाली ड्यूटी महत्त्वाची आहे आणि या कारणाने मी आपल्या मुलाला सोबत घेऊन आले'.

हे वाचा - 22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं क्षणात रस्त्यावर आणलं

प्रीती रानी हिचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. कामाप्रती असलेली निष्ठा तिच्या या वागणुकीतून दिसून येत आहे. त्यामुळे तिचे समाज माध्यमातून मोठं कौतुक केले जातं आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गौतम बुद्ध नगर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. सोमवारी त्यांनी नोएडात 1,452 कोटी रुपयांच्या विकास योजनांचे उद्घाटन केले.

हे वाचा - उतारवयात मिळालं प्रेम! 68 वर्षांच्या आजी-80 वर्षांच्या आजोबांची अनोखी लवस्टोरी

First published: March 3, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या