S M L

बिहारमध्ये चक्क बंदुकीच्या धाकानं केला नवरदेवाचा विवाह!

विनोद कुमार असं या तरुणाचं नाव असून तो ज्युनिअर इंजिनियर आहे.लग्न झाल्यानंतर, सासरी जाताना मुली रडताना दिसतात.

Sonali Deshpande | Updated On: Jan 6, 2018 02:04 PM IST

बिहारमध्ये चक्क बंदुकीच्या धाकानं केला नवरदेवाचा विवाह!

06 जानेवारी : लग्नासाठी लोक वाट्टेल ते करतात, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. बिहारमध्ये नेमका याचाच प्रत्यय आलाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे इथं चक्क बंदुकीच्या धाकानं विवाह करण्यात आलाय. विशेष म्हणजे या लग्नात बोहल्यावर चढलेला मुलगा रडताना दिसतोय. कारण त्याचं जबरदस्तीनं लग्न लावण्यात आलंय.

विनोद कुमार असं या तरुणाचं नाव असून तो ज्युनिअर इंजिनियर आहे.लग्न झाल्यानंतर, सासरी जाताना मुली रडताना दिसतात. मात्र या लग्नात बंदुकीच्या धाकामुळे आणि मुलीकडच्यांनी केलेल्या जबरदस्तीमुळे मुलगाच रडताना दिसतोय.

याप्रकरणी विनोद कुमार आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार केलीय. पण पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदवला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2018 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close