बेळगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक, 4 वाहनं जाळली,परिस्थिती नियंत्रणात

बेळगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक, 4 वाहनं जाळली,परिस्थिती नियंत्रणात

या गटांमध्ये युवकांचा मोठा समावेश होता. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला, त्यानंतर पुन्हा जमाव भडकला आणि जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.

  • Share this:

16 नोव्हेंबर : बेळगाव शहरात काल रात्री दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली आहे. बेळगावच्या खडक गल्लीत ही घटना घडली असून यामध्ये दोन गट आमनेसामने आले आणि त्यांनी परस्परांवर मोठी दगडफेक केली.

या गटांमध्ये युवकांचा मोठा समावेश होता. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला, त्यानंतर पुन्हा जमाव भडकला आणि जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बेळगावमधील अनेक ठिकाणी आता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान पोलीस प्रशासनाने बेळगावकरांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

First published: November 16, 2017, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading