भाजपच्या जागांविषयी भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक निलंबित

भाजपच्या जागांविषयी भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक निलंबित

भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळणार, अशी भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिष शास्त्रींनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःचं भवितव्य मात्र अंधारात ढकललं आहे.

  • Share this:

उज्जैन (मध्य प्रदेश), 14 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळणार. भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळणार, अशी भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिष शास्त्रींनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःचं भवितव्य मात्र अंधारात ढकललं आहे. उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातले प्राध्यापक असलेले राजेश्वर शास्त्री मुसळगावकर यांनी सोशल मीडियावरून वर्तवलेल्या या राजकीय भविष्याच्या पोस्टमुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

विद्यापीठाने निलंबित करताना सांगितलं आहे की, सोशल मीडियावर राजकीय पोस्ट करून आचार संहितेचं उल्लंघन मुसळगावकर शास्त्रींनी केलं आहे, त्यामुळे विद्यापीठ नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विक्रम विद्यापीठात ज्योतिर्विज्ञान अध्ययनाशाळेचे अध्यक्ष असणाऱ्या प्रा. मुसळगांवकर यांनी भाजपला 300  आणि रालोआला 300 च्या वर जागा मिळतील असं फेसबुक वॉलवर लिहिलं.

खरं तर मुळगांवकर यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर माफी मागत ही पोस्ट डिलिटसुद्धा केली होती. 29 एप्रिल रोजी त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की, "माझ्या ज्योतिषीय आकलनानुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारेच मी अंदाज वर्तवला होता. माझ्या या प्रयोगामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो."

मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळेच या मुसळगांवकर शास्त्रींचं निलंबन झाल्याचा प्रदेश भाजपने आरोप केला आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

VIDEO : अमित शहांच्या रॅलीत तुफान दगडफेक आणि जाळपोळ

First published: May 14, 2019, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading