मराठी बातम्या /बातम्या /देश /

ज्योतिषाच्या नादात जीभ कापण्याची वेळ; नसतं धाडस करायला गेला अन् झाली फजिती

ज्योतिषाच्या नादात जीभ कापण्याची वेळ; नसतं धाडस करायला गेला अन् झाली फजिती

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

राजा यांना अनेक दिवसांपासून साप चावल्याचं स्वप्न पडत होतं. त्यामुळे चिंतेत असलेले राजा आपल्याला या वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळावी, यासाठी एका ज्योतिषाकडे गेले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : आपल्याला अनेक स्वप्नं पडतात, काही चांगली असतात तर काही वाईट असतात. काही स्वप्नं आठवतात, तर काही आठवत नाहीत. बऱ्याचदा काही दिवस एकच स्वप्न आपल्याला पडतं. ते स्वप्न जर वाईट असेल तर आपल्या मनात अनेक विचार येतात आणि त्याचा काहीतरी अर्थ असेल असं वाटू लागतं किंवा हे वाईट स्वप्न पडू नये, यासाठी काहीतरी करायला हवं, असा विचार येतो. तर काही जण मात्र ती फक्त स्वप्नं आहेत, असं समजून सोडून देतात. असंच एक वाईट स्वप्न केरळमधील गोबिचेट्टीपलयम येथील 54 वर्षीय राजा (बदललेलं नाव) यांना पडायचं. त्यासाठी त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला आणि सल्ला त्यांना महागात पडला आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय.

राजा यांना अनेक दिवसांपासून साप चावल्याचं स्वप्न पडत होतं. त्यामुळे चिंतेत असलेले राजा आपल्याला या वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळावी, यासाठी एका ज्योतिषाकडे गेले. तिथं त्या ज्योतिषाने त्यांना सापाची पूजा करण्याचा सल्ला दिला. ज्योतिषाने राजाला एका मंदिरात जायला सांगितलं, त्या मंदिरात सापाचं वारुळ होतं. ते मंदिरात गेले आणि सापांची पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने राजा यांना आणखी एक सल्ला दिला.

हे वाचा - पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना पोतं फाटलं आणि हात पडला बाहेर, पतीचा चौकात पर्दाफाश

मंदिराच्या पुजाऱ्याने पूजेनंतर राजा यांना त्यांची जीभ सापांना दाखवण्यास सांगितलं. पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, राजा यांनी आपली जीभ सपासमोर दाखवली. त्या विषारी सापाने राजा यांच्या जीभेला क्षणार्धात चावा घेतला. सर्पदंशामुळे राजा जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक के. सुरेश आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. सर्पदंशामुळे शरीरात विष पसरलं होतं, पण जिभेवर विषाचा सर्वांत जास्त परिणाम झाला होता. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना त्यांची जीभ कापावी लागली.

हे वाचा - शारिरीक संबंध ठेवताना 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारण फारच धक्कादायक

इरोड मॅनियन मेडिकल सेंटरचे मुख्य डॉक्टर एस सेंथिल कुमारन यांनी या प्रकरणाची माहिती दिली. “रुग्णाला 18 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. सापाच्या विषामुळे त्याच्या जिभेच्या टिश्यूंवर परिणाम झाला. त्याची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे रुग्णाला वाचवण्यासाठी आम्हाला ऑपरेशन करून त्याची जीभ कापावी लागली. साप खूप विषारी होता, त्यामुळे राजाची जीभ कापूनही त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला चार दिवस संघर्ष करावा लागला," असं डॉ सेंथिल कुमारन यांनी सांगितलं.

First published:

Tags: Snake, Snake video