अनपेक्षित यशानंतर विरोधक EVMला विसरले? एकानेही केली नाही टीका!

अनपेक्षित यशानंतर विरोधक EVMला विसरले? एकानेही केली नाही टीका!

यावेळी विरोधकांनी EVM संदर्भात कोणतीही तक्रार केली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने 2014च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देशात जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा विरोधकांकडून नेहमी एक आरोप झाला तो म्हणजे EVM होय. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष, विजयाची मिरवणूक, आरोप-प्रत्यारोप, विश्लेषण सर्व काही पाहायला मिळाले. पण यावेळी विरोधकांनी EVM संदर्भात कोणतीही तक्रार केली नाही.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. देशात याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेहमीच विरोधी पक्षांकडून EVMवर आरोप करण्यात आले होते. याआधी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी पराभवाचे खापर EVMवर फोडले होते. पण महाराष्ट्र आणि हरियाणातील निकाल विरोधी पक्षांच्या अपेक्षेपेक्षा चांगले निघाले. त्यामुळेच की काय यावेळी विरोधातील एकाही नेत्याने EVM संदर्भात तक्रार केली नाही.

दोन्ही राज्यातील मतदान प्रक्रियेत EVM बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटचा अनुक्रमे 0.42 टक्के, 0.44 टक्के आणि 2.69 टक्के इतका झाला. या सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्रूट आढळली नाही. मतदानाच्या दरम्यान EVMमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली. पण याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचा आरोप विरोधकांकडून झाला नाही.

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील EVMचा मुद्दा उपस्थित झाला होता. काही जणांनी तर विदेशातून EVM हॅक करता येत असल्याचा आरोप केला होता. अर्थात निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या