Elec-widget

PHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. कशी होती पंतप्रधानांची बदललेली देहबोली?

  • Share this:

दिल्लीत सोमवारपासूनच संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना पंतप्रधान याविषयी बोलतील असा अंदाज होता. पण तीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली आज तुलनेनं सौम्य वाटत होती. नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात करण्याऐवजी त्यांनी संवादाची भाषा सुरू केली. सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी. वाद, प्रतिवाद, वादावादी तर होईलच, पण मूळात संवादाला जागा हवी. चर्चा तर होणारच, याबाबत आमचा आग्रह असेल, असं ते म्हणाले.

Loading...

सदनाचा जास्तीत जास्त वेळ जनहितासाठी खर्च व्हावा, दलहितासाठी नाही, असंही मोदी शेवटी म्हणाले.

जास्तीत जास्त जनहिताची कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.सर्वच संसद सदस्यांचं याबाबत एकमत असेल. सदनातले सगळे सदस्य या भावनेशी एकमत असतीलच,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

 संसदीय अधिवेशनाविषयी बोलल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी मोदींना विधानसभा निकालांविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान याविषयी काहीच न बोलता निघून गेले.

तीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं. राहुल गांधी यांचा हा पहिला मोठा विजय मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...