Assembly Election Result 2018 विधानसभेचे निकाल ठरवणार 2019 चं भविष्य

तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत यातल्या तब्बल 60 जागा भाजपने पटकावल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 07:42 AM IST

Assembly Election Result 2018 विधानसभेचे निकाल ठरवणार 2019 चं भविष्य

मुंबई, 11 डिसेंबर : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभांचे एक्झिट पोल भाजपची चिंता वाढवणारे आहे. त्यामुळं आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. छत्तीसगड वगळता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त होतंय.


तर मध्यप्रदेशा भाजप आणि काँग्रेसची स्थिती बरोबरीची आहे. तेलंगणात टीआरएसच बाजी मारणार हे स्पष्ट आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश हे भाजपचे बालकिल्ले आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.


त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काँग्रेसला गमाण्यासारखं काहीच नाही. या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत यातल्या तब्बल 60 जागा भाजपने आपल्या झोळीत टाकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

Loading...


विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारलं तर लोकसभेत काय होणार याची धास्ती भाजपने घेतलीय. 2014 मध्ये राजस्थानच्या एकूण 25 जागांपैकी भाजपने तब्बल 24, मध्यप्रदेशात 29 पैकी 26 तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपच्या अर्ध्या म्हणजे 30 जागा जरी कमी झाल्या तरी ती भरपाई कुठून करायची याचं गणित भाजपचे अध्यक्ष अमित शहांना


तीन राज्यांमधली लोकसभा 2014ची स्थिती


मध्यप्रदेश 2014


एकूण जागा 29


भाजप 26


काँग्रेस 03


राजस्थान 2014


एकूण जागा 25


भाजप 24


काँग्रेस 01


छत्तीसगड 2014 


एकूण जागा 11


भाजप 10


काँग्रेस 01

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 07:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...