हैद्राबाद, 11 डिसेंबर : तेलंगणाच्या निकालांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. आता या निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे जे आकडे समोर आले होते त्यात जवळपास सर्वच एक्झीट पोलमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसला बहुमत मिळणार असा अंदाज व्यक्त केला होता.
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते. 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.
टाईम्स नाऊ आणि सीएनक्सच्या पोलमध्ये कोणाला किती जागा?
तेलंगणा राष्ट्र समिती – 66
काँग्रेस – 37
भाजप – 7
इतर - 9
दरम्यान, विधानसभा निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल्समधून प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत असतो.
निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी अनेकांचं या एक्झिट पोल्सकडे लक्ष लागलेलं असतं. प्रत्यक्षात यातील अनेक पोल चुकीचे ठरतात. तर काही एक्झिट पोल निकालाच्या जवळ जाणारे असतात.
एक्झिट पोल हे नेहमी मतदानाच्या दिवशीच केले जातात. मतदान केल्यानंतर जेव्हा मतदार पोलिंग बूथमधून बाहेर पडतात, तेव्हाच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांकडून मतदारांना त्यांचं मत विचारलं जातं.
मतदारांनी सांगितलेल्या माहिती एक्झिट पोल करणाऱ्या संस्था एकत्रित करतात. या संस्था प्रत्येक मतदाराचंच मत विचारात घेत नाहीत. तर त्यांनी एक सॅम्पल साईज ठरवलेली असते.
वेगवेगळ्या परिसरातील, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी बोलून ही माहिती जमा केली जाते. त्याआधारेच निवडणूक निकालांबाबत अंदाज बांधला जातो.
राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदलाची 20 वर्षांची परंपरा कायम राहते की तुटते हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा