Assembly Election Result 2018 Live- १५ वर्षांनी काँग्रेसला ‘अच्छे दिन’, छत्तीसगडमध्ये एकहाती सत्ता

Assembly Election Result 2018 Live- १५ वर्षांनी काँग्रेसला ‘अच्छे दिन’, छत्तीसगडमध्ये एकहाती सत्ता

Assembly Election Result 2018 LIVE: छत्तीसगड- मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला उभ्या होत्या.

  • Share this:

रायपुर, ११ नोव्हेंबर २०१८- छत्तीसगडमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भाजपला धोबीपछाड केले. ९० जागांसाठी झालेल्या मतदानात काँग्रेस ६१, भाजप २२ आणि बहुजन समाज पक्षाने ८ जागा जिंकल्या. छत्तीसगडमध्ये गेली १५ वर्ष भाजपची सरकार होती. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र आता काँग्रेसने याला सुरूंग लावला आहे. १५ वर्ष छत्तीसगडचे मुख्यमंत्री असलेले रमण सिंह यांना दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांनी मात दिली. करुणा या गेली कित्येक वर्ष भाजपमध्ये होत्या. मात्र यंदा भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसचा हात पकडला.


राजनांदगांव या जागेसाठी मुख्यमंत्री रमण सिंह आणि करुणा शुक्ला एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मागच्या दोन निवडणुकांमध्ये ही जागा भाजपने राखली होती. 2013 च्या निवडणुकीत भाजपनं 49 तर काँग्रेसनं 39 जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी पाहिली तर दोन्ही पक्षांमध्ये चुरस होती. भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 टक्के व्होट शेअर होता. बस्तर, बिलासपुर, दुर्ग, रायपुर, सरगुजा या सर्व ठिकाणी काँग्रेसने सहज विजय मिळवला.


एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असे म्हटले जात होते. मात्र हा एक्झिट पोल फेल ठरल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यासाठी ही निवडणूक मोठी परीक्षा ठरणार आहे. बहुजन समाज पक्षाबरोबर त्यांनी युती केली आहे. या दोन्हीचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो.

Loading...
यावेळी छत्तीसगडमध्ये 76.35 टक्के मतदान झालं. 2013 च्या निवडणुकीत 1.05 टक्क्यांनी जास्त मतदान झालं होतं. दंतेवाडा हा मतदारसंघ नक्षलवादी भागात येतो. त्यामुळे या भागातल्या आमदारांकडेही देशाचं लक्ष लागलं आहे. या भागातून ७ उमेदवार उभे आहेत. त्यापैकी भाजपचे भीमा मंडावी, काँग्रेसचे देवती कर्मा आणि सीपीआय युतीचे नंदराम सोरी यांच्यात चुरस आहे.


रमण सिंग यांच्या नेतृत्वाखाली सलग तीनदा भाजपला या राज्यात यश मिळालं होतं. मात्र आता ते पिछाडीवर राहिल्यामुळे भाजपकडून त्यांचा छत्तीसगडमधला बालेकिल्ला  जाणार का हा मोठा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यासाठी ही निवडणूक मोठी परीक्षा होती. बहुजन समाज पक्षाबरोबर त्यांनी युती केली आहे. या दोन्हीचा फायदा काँग्रेसला मिळाला. तब्बल १५ वर्षांनंतर आता छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...