Assembly Election Result 2018 LIVE तेलंगणातला पहिला कल 'टीआरएस'कडे

विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिलाच कल टीआरएसच्या बाजूने आलाय.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 08:13 AM IST

Assembly Election Result 2018 LIVE तेलंगणातला पहिला कल 'टीआरएस'कडे

हैदराबाद, 11 डिसेंबर : विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिलाच कल टीआरएसच्या बाजूने आलाय. एका जागेवर टीआरएसला आघाडी मिळालीय. एक्झीट पोल्स मध्येही इथे टीआरएसला बहुमत मिळेल असं अंदाज व्यक्त केला होता.

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते. 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

 

महत्वाचे मतदार संघ


Loading...

गजवेल

सगळ्यांचं लक्ष गजवेलकडे लागलं आहे, कारण मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघांवर त्यांची मोठी पकड आहे. काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार आहेत. 2014 मध्ये त्यांनी रेड्डींचा पराभव केला होता.


गोशमहल

जुन्या हैदराबादमध्ये हा मतदार संघ असून मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. टीआरएसचे प्रेम सिंग राठोड हे इथले आमदार आहेत. 2016 मध्ये त्यांनी भाजपमधून टीआरएसमध्ये प्रवेश केला होता. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती.


श्रीशैला

तेलंगणाचे आयटी मंत्री के.टी. रामा राव हे इथले आमदार आहेत. काँग्रेसचे केके महेंद्र रेड्डी, एन.नारला गौडा हे भाजपचे नेते यांनी त्यांना मोठं आव्हान दिलंय. रामा राव हे  केटीआर या नावाने ओळखले जातात. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे ते पुत्र आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...