Assembly Election Result 2018 LIVE 'तेलंगणात 'अलिबाबा आणि चाळीस चोरां'चा पराभव'

Assembly Election Result 2018 LIVE  'तेलंगणात 'अलिबाबा आणि चाळीस चोरां'चा पराभव'

' कुणीही येऊन इथे काहीही बोललं तर तेलंगणातली जनता खपवून घेणार नाही.'

  • Share this:

हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने विक्रमी बहुमताकडे वाटचाल सुरू केल्याने सर्व राज्यभर कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण आलंय. तर काँग्रेसच्या कार्यालयात सामसुम आहे. या निवडणुकीत तेुलुगू देशम, काँग्रेस यांची आणि त्यांच्या मित्र पक्षांची आघाडी होती मात्र अलिबाबा आणि चाळीस चोरांची ही युती चालली नाही अशी टीका चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री तलासनी श्रीनिवास यांनी केलीय. कुणीही येऊन इथे काहीही बोललं तर तेलंगणातली जनता खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले.

या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी तेलंगणातल्या मेंढाचल इथं रॅली घेतली. ही रॅली घेऊन काँग्रेसने 'सोनिया अम्मा' कार्ड खेळल्याचं बोललं जात होतं मात्र हे कार्ड चाललं नाही असं आता निकालांवरून स्पष्ट होतेय.

तेलंगणा निर्मितीचं श्रेय घेण्याचा प्रयत्नही काँग्रेसने प्रयत्न केला मात्र तो प्रयत्नही यशस्वी ठरला नाही. तर तेलुगू देशम पक्षासोबची आघाडीही फेल ठरली.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर विधानसभेची दुसरी निवडणूक पार पडत आहे. तब्बल 119 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत  1761 उमेदवार रिंगणात आहेत स्वतंत्र तेलंगणा निर्मितीचे श्रेय घेऊन गेल्या सत्तेवर आलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान होत आणि त्यांनी ते यशस्वीपणे पारही पाडलं. तर एकमेकाचे परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेस आणि टीडीपीने या निवडणुकीत एकत्र येऊन त्यांनी महाआघाडी बनवली होती.

तेलंगणा निर्मितीचं श्रेय घेण्यासाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आपली ताकद पणाला लावली होती मात्र जनतेने तेलंगाना राष्ट्र समितीला तब्बल 34 टक्के मते देऊन 63 जागा दिल्या होत्या दुसरीकडे काँग्रेस पक्षाला 25 टक्के मते पडून तब्बल 21 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

तर पक्षाने 14 टक्के मते मिळवून तब्बल 15 जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या साडेचार वर्षात के चंद्रशेखर राव यांनी  टीडीपी आणि काँग्रेसच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतल्याने या दोन्ही पक्षांना धक्का बसला होता.

 

First published: December 11, 2018, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading