हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने विक्रमी बहुमताकडे वाटचाल सुरू केल्याने सर्व राज्यभर कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण आलंय. तर काँग्रेसच्या कार्यालयात सामसुम आहे. या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी तेलंगणातल्या मेंढाचल इथं रॅली घेतली. ही रॅली घेऊन काँग्रेसने 'सोनिया अम्मा' कार्ड खेळल्याचं बोललं जात होतं मात्र हे कार्ड चाललं नाही असं आता निकालांवरून स्पष्ट होतेय.
तेलंगणा निर्मितीचं श्रेय घेण्याचा प्रयत्नही काँग्रेसने प्रयत्न केला मात्र तो प्रयत्नही यशस्वी ठरला नाही. तर तेलुगू देशम पक्षासोबची आघाडीही फेल ठरली.
तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर विधानसभेची दुसरी निवडणूक पार पडत आहे तब्बल 119 जागांसाठी होणार्या निवडणुकीत 1761 उमेदवार रिंगणात आहेत स्वतंत्र तेलंगणा निर्मितीचे श्रेय घेऊन गेल्या सत्तेवर आलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे तर एकमेकाचे परंपरागत विरोधी असलेले काँग्रेस आणि टीडीपी या निवडणुकीत एकत्र येऊन त्यांनी महाआघाडी बनविली मात्र त्याचाही फायदा झाला नाही.
आंध्र प्रदेश असतानापासून तेलंगणा राज्याची स्थापना होईपर्यंत तेलगू देशम आणि काँग्रेस हे एकमेकांचे परंपरागत विरोधी पक्ष राहिलेले आहेत आणि या विधानसभा निवडणुकीत मात्र चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देशम आणि काँग्रेस पक्ष हे एकत्र आलेले होते. त्यांच्यासोबत भाकपा माकपा तेलंगाना आंदोलनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या टीजेएस सह सगळया पक्षांची एकत्रित मोट बांधून महाआघाडी तयार करण्यात आलेली होती.
तेलंगणाच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली. तेलंगणा राष्ट्र समितीने असदुद्दीन औवेसींच्या एमआयएम य मजलीस या पक्षाला सोबत घेतले आहे. तेलंगणाचे प्रभारी मुख्यमंत्री असलेले के चंद्रशेखर राव तेलंग त्यांचे सुपुत्र के टी आर म्हणजे तारक रामराव आणि केसीआर यांचे भाचे तेलंगणाचे जलसंपदा मंत्री हरिष राव आणि के चंद्रशेखर राव यांची कन्या खासदार कविता यानी निवडणुकीच्या प्रचाराची सुञे हातात घेतली होती.
या निवडणुकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के चंद्रशेखर राव यांनी गेल्या चार चार वर्षात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज मोफत दिलेली आहे आणि दुसरीकडे गोदावरीच्या पाण्यावर आधारित मेडीगट्टा कालेश्वर या मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचे जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांच्या आधारे मतदारांना मतांचं दान मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा