मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assembly Election Result 2018 LIVE : विधानसभांचे निकाल हा लोकांचा राग - राऊतांचा भाजपला टोला

Assembly Election Result 2018 LIVE : विधानसभांचे निकाल हा लोकांचा राग - राऊतांचा भाजपला टोला

'भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. हा काँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग आहे.'

'भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. हा काँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग आहे.'

'भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. हा काँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग आहे.'

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : पाच राज्यातले विधानसभाचे निकाल हा काँग्रेसचा विजय नसून लोकांचा राग आहे. भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. भाजपचं सरकार असलेल्या तीन मुख्य राज्यांमध्ये भाजपचा पराभव होतोय. तर तेलंगणात टीआरएसने घवघवीत यश मिळवलंय. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्येही भाजप पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपला दिलेला हा सल्ला महत्वाचा मानला जातोय.

 

मोदींनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल आणि उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत देशातल्या स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

संसद भवनात झालेल्या एका बैठकीनंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र निकालावर कुठलंही भाष्य केलं नाही. विधानसभांच्या मतमोजणीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये काँग्रेसची आघाडी आहे. तर तेलंगणात टीआरएसची लाट आलीय. त्या लाटेल इतर सर्वपक्ष भुईसपाट झाले. या निकालाचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.

लोकसभेवर परिणाम होणार का?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची नांदी समजली जात आहे. या सेमीफायनलमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचीसुद्धा परीक्षाच ठरेल. दोन्ही नेते याबरोबरच छोट्या पक्षांच्या भूमिकांची कसोटी लागणार आहे. एक्झिट पोल्सचे अंदाज थेट निकालापेक्षा वेगळे जरी लागले तरी यातून ही लाट, जादू आणि आवाका निश्चित होणार आहे.

एक्झिट पोल्सनी वर्तवलेले निकालाचे अंदाज आणि प्रत्यक्षातले निकाल यात साम्य असतं का? किती वेळा हे निकाल खरे ठरतात आणि किती वेळा सपशेल चुकतात? याचं विश्लेषण दर वेळी होत असलं, तरी एक्झिट पोल्समधून मतदारांचा कल दिसून येतो. एक्झिट पोल्सचे प्राथमिक अंदाज पाहता मोदी लाटेचा प्रभाव कमी झाल्याचं निश्चित दिसतंय.

या राज्यांत लोकसभेत कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या, हेही बघणं महत्त्वाचं ठरेल. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मुसंडी मारली होती, हे या आकड्यांतून दिसतंय. आता या मतदारसंघांमध्ये कल कुठे आहे हे आजच्या विधानसभा निकालांवरून कळू शकतं.

First published:

Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, Narendra modi, Sanjay raout, Shivsena, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा