Assembly Election Result 2018 LIVE तेलंगणात 'MIM'ची बालेकिल्ल्यात आगेकूच

तेलंगणात 12.7% अल्पसंख्याक समुदाय आहे आणि राज्यातल्या 119 पैकी 40 ते 45 जागांवर अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 10:16 AM IST

Assembly Election Result 2018 LIVE  तेलंगणात 'MIM'ची बालेकिल्ल्यात आगेकूच

 हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असली तरी जुन्या हैदराबादमधल्या सर्व सात पैकी 5 जागांवर असदुद्दीन ओवेसींच्या 'MIM'ने आघाडी घेतलीय. या सातही जागांवर ओवेसींचा प्रभाव आहे.  मागच्या निवडणुकीत 'MIM'ला 6 जागा मिळाल्या होत्या.  सकाळी 10.30 वाजेपर्यंत सत्ताधारी टीआरएसची तब्बल 90 जागांवर आघाडी होती.


सत्ताधारी टीआरएस हा इतर सर्व पक्षांच्या खूपच पुढे आहे. तर काँग्रेसची वाटचाल धीम्या गतीनं सुरू आहे. भाजप आणि तेलुगू देसम आणि काँग्रेसची डाळ तिथे शिजली नाही. तेलुगू देशमने तिथे काँग्रेससोबत आघाडी केली होती. तसच इतर छोट्या पक्षांनाही त्यांनी सोबत घेतलं होतं मात्र या महाआघाडीला तेलंगणातल्या लोकांनी दणका दिलाय.


119 जागा असलेल्या तेलंगणात बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. तर टीआरएसने आताच दोन तृतीआंश बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा करिष्मा कायम आहे हेच सिद्ध झालंय. राव हे तेलंगणा निर्मितीच्या काळात जननायक म्हणून पुढे आले होते. त्यांची जादू अजुनही कायम असल्याच सिद्ध झालंय.

Loading...


मुस्लिम मतांचा टक्का


तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते. 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.


तेलंगणात 12.7% अल्पसंख्याक समुदाय आहे आणि राज्यातल्या 119 पैकी 40 ते 45  जागांवर अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे. राजकीय निरिक्षकांच्या मते राज्यांच्यातल्या 29 विधानसभा मतदार संघात 15 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. तर एकूण 43 मतदार संघावर मुस्लिम मतांचा प्रभाव आहे.


प्रभाव कायम


याच मुस्लिम मतांवर ओवेसींचा कायम डोळा असतो. पण एक विशिष्ट भाग सोडला तर इतर भागात ते प्रभाव दाखवू शकले नाही. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचा काही भागात प्रभाव आहे.

तेलंगणाच्या निवडणुकीत मतांच्या ध्रुविकरणासाठी भाजपने ओवेसींशी छुपी युती केल्याचा आरोप झाला.


या निवडणुकीत काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने एकत्र मिळून निवडणूक लढवली. मात्र टीआरएसचा प्रभाव जास्त असल्याने इतर कुठल्याच पक्षांची डाळ तिथे शिजणार नाही अशीच चिन्ह आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री केसीआर यांच्या कुटूंबियाच्या राजकारणातल्या सहभागावरुन कांग्रेस आणि भाजपने केसीआर यांच्यावर टीका केली होती.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...