हैदराबाद, 11 डिसेंबर : जुन्या हैदराबादमधून MIM चे नेते आणि असादुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रे-तेलुगू देशम आघाडीच्या उमेदवराचा पराभव केला. तर इतर चार जागांवरही MIM ची आघाडी आहे. MIM ने यावेळी 7 जागा लढवल्या होत्या. त्यांनी चंद्रयानगुट्टामधून विजय. हा त्यांचा सलग पाचवा विजय आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते कुप्रसिद्ध आहे. चिथोवणीखोर भाषणांसाठी त्यांना जेलची हवाई खावी लगाली होती.
दरम्यान तेलंगणावरचं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं गारुड अजुनही कायम आहे. त्यांच्या टीआरएसची मोठी लाट आली असून त्या लाटेत इतर सर्व पक्ष भुईसपाट झाले आहेत. टीआरएसने तब्बल 95 पेक्षा जास्त जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. 119 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता असून हा आकडा टीआरएसने केव्हाच ओलांडला आहे.
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांपैकी AIMIM फक्त 07 जागा लढवत आहे. सध्या त्यांच्याकडे 07 जागा असून गेल्या निवडणुकीत त्यांनी 08 जागा लढवल्या होत्या. कायम आक्रमक असणारे आणि मिस्लिमांच्या प्रतिष्ठेची बाजू घेणारे ओवेसा या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाहीत अशीच शक्यता आहे. तर आम्ही लढवलेल्या सर्व जागा जिंकू असा दावा असाद्दुद्दीन ओवेसी यांनी केलाय.
ओवेसी हे तेलंगणातले मोठे मुस्लिम नेते आहेत. ते मुसलमानांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात. जुन्या हैदराबादमध्ये असलेल्या सहा विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. तेलंगणात 12.7% अल्पसंख्याक समुदाय आहे आणि राज्यातल्या 119 पैकी 40 ते 45 जागांवर अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे. राजकीय निरिक्षकांच्या मते राज्यांच्यातल्या 29 विधानसभा मतदार संघात 15 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. तर एकूण 43 मतदार संघावर मुस्लिम मतांचा प्रभाव आहे.
याच मुस्लिम मतांवर ओवेसींचा कायम डोळा असतो. पण एक विशिष्ट भाग सोडला तर इतर भागात ते प्रभाव दाखवू शकले नाही. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचा काही भागात प्रभाव आहे.
तेलंगणाच्या निवडणुकीत मतांच्या ध्रुविकरणासाठी भाजपने ओवेसींशी छुपी युती केल्याचा आरोप झाला.
या निवडणुकीत काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने एकत्र मिळून निवडणूक लढवली. मात्र टीआरएसचा प्रभाव जास्त असल्याने इतर कुठल्याच पक्षांची डाळ तिथे शिजणार नाही अशीच चिन्ह आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री केसीआर यांच्या कुटूंबियाच्या राजकारणातल्या सहभागावरुन कांग्रेस आणि भाजपने केसीआर यांच्यावर टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा