हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. सकाळी 10 वाजेपर्यंत सत्ताधारी टीआरएसची 84 जागांवर आघाडी होती. सत्ताधारी टीआरएस हा इतर सर्व पक्षांच्या खूपच पुढे आहे. तर काँग्रेसची वाटचाल धीम्या गतीनं सुरू आहे. भाजप आणि तेलुगू देसम आणि काँग्रेसची डाळ तिथे शिजली नाही. तेलुगू देशमने तिथे काँग्रेससोबत आघाडी केली होती.
तसच इतर छोट्या पक्षांनाही त्यांनी सोबत घेतलं होतं मात्र या महाआघाडीला तेलंगणातल्या लोकांनी दणका दिलाय. 119 जागा असलेल्या तेलंगणात बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. तर टीआरएसने आताच दोन तृतीआंश बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा करिष्मा कायम आहे हेच सिद्ध झालंय. राव हे तेलंगणा निर्मितीच्या काळात जननायक म्हणून पुढे आले होते. त्यांची जादू अजुनही कायम असल्याच सिद्ध झालंय. मतमोजणीला सुरूवात होताच मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि आयटी मंत्री के.टी. रामा राव यांनी सकाळीच ट्विट करत एक खास फोटो ट्विट केलाय. त्या फोटोत ते निशाना साधताना दिसत आहेत.
त्यांचा निशाणा कुणावर आहे याची चर्चा आता रंगलीय. एक्झीट पोल्स मध्येही इथे टीआरएसला बहुमत मिळेल असं अंदाज व्यक्त केला होता. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते.
2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा