Assembly Election Result 2018: राहुल गांधींना बाईकवर फिरवणारा हा नेता जिंकणार का?

Assembly Election Result 2018: राहुल गांधींना बाईकवर फिरवणारा हा नेता जिंकणार का?

Assembly Election Result 2018 LIVE: यावळी राज्यात रेकॉर्ड 75.05 टक्के मतदान झालं. आत्तापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान आहे.

  • Share this:

भोपाळ, 11 डिसेंबर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सगळ्यात जवळचा मानला गेलेला हा काँग्रेस नेता विधानसभा निवडणुकांमध्ये हारणार की जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

देशभर भाजपची लाट असतानाही निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱ्या या नेत्याला विरोधी पक्षाचा नेता मधु वर्मा यांनी धूळ चारली होती.

जीतू पटवारी नावाचा हा नेता राहुल गांधी यांना बाईकवर फिरवल्यामुळे खूप चर्चेत आले होते. सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. तर मंदसौरच्या शेतकरी आंदोलनादरम्यान, राहुल गांधी कसेतरी पोलिसांपासून लपून राजस्थानहून मध्य प्रदेशला आले होते. यावेळी पटवारी यांनी राहुल गांधी यांना त्याच्या बाईकवर बसवलं होतं. तेव्हापासून जीतू पटवारी हे भारी चर्चेत आले होते.

जीतू पटवारी इंदौरच्या राऊ विधानसभा मतदार संघातून मैदानात आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या जीतू जिराती यांना आव्हान दिलं होतं.

विधानसभा निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळाल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यात सर्व देशाचं लक्ष मध्य प्रदेशकडे लागलं आहे. यावळी राज्यात रेकॉर्ड 75.05 टक्के मतदान झालं. आत्तापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे आता जनतेनं कुणाच्या पारड्यात कौल टाकला हे 11 डिसेंबरला उघड होणार आहे.

2008च्या निवडणुकीत भाजपने 143, काँग्रेसने 71, बसपानं 7 आणि इतर अपक्षांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे 2013मध्ये भाजपनं 165 जागा घेऊन आपलं सरकार बनवलं होतं. यावेळी काँग्रेसला 58, बसपाला 4 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या.

AssemblyElectionResults2018 या उमेदवारांनी प्रचारादरम्यान काय काय केलं ते पाहून व्हाल थक्क!

आताच्या निवडणुकीत भाजपचे 230 आणि काँग्रेसचे 229 उमेदवार रिंगणात आहेत. बसपा 227, गोंगपा (गोंडवाना गणतंत्र पार्टी) 73 आणि समाजवादी पक्ष 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. पहिल्यांदा सपाक्सनं 109 उमेदवार निवडणुकीत उमेदवार उभे केलेत, तर आम आदमी पक्षाचे 207 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.

मध्य प्रदेशात सामान्य वर्गासाठी 148, एससीसाठी 35 आणि एसटीसाठी 47 जागा आरक्षित आहेत. इथे 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यातला विधानसभेचा कार्यकाळ 7 जानेवारी 2019ला संपतोय.

राज्यातल्या 65 हजार 367 मतदान केंद्रांवर 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यातल्या एकूण मदारांची संख्या 5 कोटी 4 लाख 33 हजार 79 एवढी आहे. त्यातल्या 3 कोटी 78 लाख 52 हजार 213 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 1 कोटी 99 लाख 86 हजार 978 पुरूष मतदार, तर 1 कोटी 78 लाख 64 हजार 900 महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यात सर्वात जास्त 83.92 टक्के मतदान छिंदवाडा जिल्ह्यात तर सर्वात कमी 61.49 टक्के मतदान भिण्ड जिल्ह्यात झालं.

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: December 11, 2018, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading