Home /News /national /

Assembly Election Result 2018 LIVE मध्य प्रदेश: बुधनीमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंग आघाडीवर

Assembly Election Result 2018 LIVE मध्य प्रदेश: बुधनीमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंग आघाडीवर

Bhopal: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan campaigns in support of BJP candidate Rameshwar Sharma, in Bhopal, Monday, Nov 26, 2018. (PTI Photo)  (PTI11_26_2018_000213B)

Bhopal: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan campaigns in support of BJP candidate Rameshwar Sharma, in Bhopal, Monday, Nov 26, 2018. (PTI Photo) (PTI11_26_2018_000213B)

मध्यप्रदेशात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या बुधनी मतदार संघाकडे.

    भोपाळ, 10 डिसेंबर : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मतदार संघात म्हणजेच बुधनीमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आघाडीवर आहे. सुरुवातीच्या आकड्यांनुसार काँग्रेस आघाडीवर होती पण आता मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळाल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यात सर्व देशाचं लक्ष मध्यप्रदेशकडे लागलं आहे. यावळी राज्यात रेकॉर्ड 75.05 टक्के मतदान झालं. आत्तापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे आता जनतेनं कुणाच्या पारड्यात कौल टाकला हे 11 डिसेंबरला उघड होणार आहे. मध्यप्रदेशात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या बुधनी मतदार संघाकडे. सीहोर जिल्ह्यातल्या या मतदार संघातून ते 1990 मध्ये पहिल्यांदा  विधासभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून त्यांची या मतदारसंघावर पकड आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव हे तिथे काँग्रेसचे उमेदवार असून चौहान यांना त्यांनी कडवं आव्हान दिलंय. 2013 मध्ये चौहान यांनी काँग्रेसच्या महेंद्र सिंग यांचा  84,805 मतांनी पराभव केला होता. तर सिंग यांना 43,925 मतं पडली होती. शिवराजसिंग यांच्याकडे सर्व राज्याची जबाबदारी असल्याने बुधनीतल्या प्रचाराची जबाबदारी यावेळी त्यांच्या पत्नी साधना सिंह यांनी सांभाळली होती. शिवराजसिंग हे फक्त काही दिवस बुधनीत प्रचारासाठी आले होते. LIVE AssemblyElectionResults2018 : पाच राज्यांचा थोड्याच वेळात निकाल राज्यातल्या 65 हजार 367 मतदान केंद्रांवर 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यातल्या एकूण मदारांची संख्या 5 कोटी 4 लाख 33 हजार 79  एवढी आहे. त्यातल्या 3 कोटी 78 लाख 52 हजार 213 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात  1 कोटी 99 लाख 86 हजार 978 पुरूष मतदार, तर 1 कोटी 78 लाख 64 हजार 900 महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यात सर्वात जास्त 83.92 टक्के मतदान छिंदवाडा जिल्ह्यात तर सर्वात कमी 61.49 टक्के मतदान भिण्ड जिल्ह्यात झालं. VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी
    First published:

    Tags: #News18BattleOfMadhyaPradesh, Budhni, ElectionWithNews18, Madhyapradesh, Shivraj singh chauhan, बुधनी, मध्य प्रदेश, शिवराजसिग चौहान

    पुढील बातम्या