मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assembly Election Result 2018 LIVE तेलंगणा : मतमोजणी सुरू होताच मुख्यमंत्र्यांच्या मुलाने साधला 'निशाणा'

Assembly Election Result 2018 LIVE तेलंगणा : मतमोजणी सुरू होताच मुख्यमंत्र्यांच्या मुलाने साधला 'निशाणा'

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास फोटो ट्विट करून निशाणा साधलाय.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास फोटो ट्विट करून निशाणा साधलाय.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास फोटो ट्विट करून निशाणा साधलाय.

हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसचं पारडं जड राहणार अशी शक्यता असल्यामुळं मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि आयटी मंत्री के.टी. रामा राव यांनी सकाळीच ट्विट करत एक खास फोटो ट्विट केलाय. त्या फोटोत ते निशाणा साधताना दिसत आहेत. त्यांचा निशाना कुणावर आहे याची चर्चा आता रंगलीय.

विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिलाच कल टीआरएसच्या बाजूने आलाय. एका जागेवर टीआरएसला आघाडी मिळालीय. एक्झीट पोल्स मध्येही इथे टीआरएसला बहुमत मिळेल असं अंदाज व्यक्त केला होता.

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं.

यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते. 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाचे मतदार संघ

गजवेल

सगळ्यांचं लक्ष गजवेलकडे लागलं आहे, कारण मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघांवर त्यांची मोठी पकड आहे. काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार आहेत. 2014 मध्ये त्यांनी रेड्डींचा पराभव केला होता.

गोशमहल

जुन्या हैदराबादमध्ये हा मतदार संघ असून मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. टीआरएसचे प्रेम सिंग राठोड हे इथले आमदार आहेत. 2016 मध्ये त्यांनी भाजपमधून टीआरएसमध्ये प्रवेश केला होता. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती.

श्रीशैला

तेलंगणाचे आयटी मंत्री के.टी. रामा राव हे इथले आमदार आहेत. काँग्रेसचे केके महेंद्र रेड्डी, एन.नारला गौडा हे भाजपचे नेते यांनी त्यांना मोठं आव्हान दिलंय. रामा राव हे  केटीआर या नावाने ओळखले जातात. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे ते पुत्र आहेत. त्यामुळं सर्व देशाचं लक्ष त्याकडे लागलंय.

First published:

Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा