हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसचं पारडं जड राहणार असे स्पष्ट झालंय. सत्ताधारी टीआरएस हा इतर सर्व पक्षांच्या खूपच पुढे आहे. सकाळी साडे नऊ पर्यंत टीआरएस ने 65 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती तर काँग्रेसने 11 जागांवर. भाजप आणि तेलुगू देसमची डाळ तिथे शिजली नाही. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा करिष्मा कायम आहे हेच सिद्ध झालंय. राव हे तेलंगणा निर्मितीच्या काळात जननायक म्हणून पुढे आले होते. त्यांची जादू अजुनही कायम असल्याच सिद्ध झालंय.
मतमोजणीला सुरूवात होताच मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि आयटी मंत्री के.टी. रामा राव यांनी सकाळीच ट्विट करत एक खास फोटो ट्विट केलाय. त्या फोटोत ते निशाना साधताना दिसत आहेत. त्यांचा निशाणा कुणावर आहे याची चर्चा आता रंगलीय. एक्झीट पोल्स मध्येही इथे टीआरएसला बहुमत मिळेल असं अंदाज व्यक्त केला होता.
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 73.2 टक्के एवढं रेकॉर्ड मतदान झालं. बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. 119 जागांसाठी तब्बल 1,821 74`मतदार मैदानात होते. 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभे निवडणूक आहे. विधानसभेची मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.
ओवेसींच काय होणार?
कायम आक्रमक असणारे आणि मिस्लिमांच्या प्रतिष्ठेची बाजू घेणारे ओवेसा या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाहीत अशीच शक्यता आहे. तर आम्ही लढवलेल्या सर्व जागा जिंकू असा दावा असाद्दुद्दीन ओवेसी यांनी केलाय.
ओवेसी हे तेलंगणातले मोठे मुस्लिम नेते आहेत. ते मुसलमानांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात. जुन्या हैदराबादमध्ये असलेल्या सहा विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे.
तेलंगणात 12.7% अल्पसंख्याक समुदाय आहे आणि राज्यातल्या 119 पैकी 40 ते 45 जागांवर अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे. राजकीय निरिक्षकांच्या मते राज्यांच्यातल्या 29 विधानसभा मतदार संघात 15 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. तर एकूण 43 मतदार संघावर मुस्लिम मतांचा प्रभाव आहे.
याच मुस्लिम मतांवर ओवेसींचा कायम डोळा असतो. पण एक विशिष्ट भाग सोडला तर इतर भागात ते प्रभाव दाखवू शकले नाही. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचा काही भागात प्रभाव आहे.
तेलंगणाच्या निवडणुकीत मतांच्या ध्रुविकरणासाठी भाजपने ओवेसींशी छुपी युती केल्याचा आरोप झाला.
या निवडणुकीत काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने एकत्र मिळून निवडणूक लढवली. मात्र टीआरएसचा प्रभाव जास्त असल्याने इतर कुठल्याच पक्षांची डाळ तिथे शिजणार नाही अशीच चिन्ह आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री केसीआर यांच्या कुटूंबियाच्या राजकारणातल्या सहभागावरुन कांग्रेस आणि भाजपने केसीआर यांच्यावर टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asaduddin owaisi, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, तेलंगणा