Assembly Election Result 2018 Live छत्तीसगड : रमण सिंग पिछाडीवर करुणा शु्क्ला मारणार का बाजी?

Assembly Election Result 2018 Live छत्तीसगड : रमण सिंग पिछाडीवर करुणा शु्क्ला मारणार का बाजी?

Assembly Election Result 2018 LIVE: छत्तीसगड- मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला उभ्या आहेत.

  • Share this:

रायपूर, 11 डिसेंबर :छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह सध्या मतमोजणीत पिछाडीवर चालत आहेत. राजनांदगांव ही विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो. दुर्गमध्ये येणारा हा मतदारसंघ महाराष्ट्रालाही तसा जवळ आहे. विशेषतः मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासाठी हा बालेकिल्ला. ते स्वतः या विधानसभेसाठी रिंगणात आहेत. मात्र ते १०७ मतांनी पिछाडीवर आहेत.  शिवाय या जागेसाठी इतर ३० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी काँग्रेसच्या उमेदवार करुणा शुक्ला यांचं आव्हान मोठं आहे. कारण करुणा या भाजपचेच मोठे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची आहेत. छत्तीसगड विधानसभा मतदारसंघाच्या 90 जागांसाठी मतदान झालं. सध्या याच जागांच्या मतमोजणी सुरू आहे. छत्तीसगढमध्ये मुख्य लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्ये.

रमण सिंग आणि करुणा शुक्ला पहिल्यांदाच आमने सामने आहेत. मागच्या दोन निवडणुकांमध्ये ही जागा भाजपने राखली होती.  2013 च्या निवडणुकीत भाजपनं 49 तर काँग्रेसनं 39 जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी पाहिली तर दोन्ही पक्षांमध्ये चुरस होती. भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 टक्के व्होट शेअर होता.

रमण सिंग यांच्या नेतृत्वाखाली सलग तीनदा भाजपला या राज्यात यश मिळालं होतं. मात्र आता ते पिछाडीवर राहिल्यामुळे भाजपकडून त्यांचा बालेकिल्ला जाणार का हा मोठा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे.

एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कायम दिसतंय.  काँग्रेसलाही ३०च्या वर जागा मिळतील असे अंदाज सांगत आहेत.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यासाठी ही निवडणूक मोठी परीक्षा ठरणार आहे. बहुजन समाज पक्षाबरोबर त्यांनी युती केली आहे. आता या दोन्हीचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. नक्षलवाद्यांनी धमक्या दिलेल्या असल्या तरी या वेळी छत्तीसगडमध्ये 76.35 टक्के मतदान झालं. 2013च्या निवडणुकीत 1.05 टक्क्यांनी जास्त मतदान झालं होतं.

दंतेवाडा हा मतदारसंघ नक्षलवादी भागात येतो. त्यामुळे या भागातल्या आमदारांकडेही देशाचं लक्ष लागलं आहे. या भागातून ७ उमेदवार उभे आहेत. त्यापैकी भाजपचे भीमा मंडावी, काँग्रेसचे देवती कर्मा आणि सीपीआय युतीचे नंदराम सोरी यांच्यात चुरस आहे.

First published: December 10, 2018, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading