सध्या राज्यात कोणाचे सरकार? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. यासह केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डावे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये सर्वांनंद सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन आहे. त्याचवेळी पुडुचेरी मध्ये नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरकार होती जी शेवटच्या काही दिवसात अल्पसंख्याक मध्ये आल्यामुळे पडली. आता तिथे सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. यावेळी तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294, आसामच्या 126, पुडुचेरीच्या 30 आणि केरळच्या 140 जागांवर निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमधील 294 जागांवर निवडणुका: 2016 च्या निवडणूकीत TMC पार्टीने 211 जागांवर विजय मिळवत त्यांचं सरकार स्थापन केलं होत. त्यावेळी डाव्या आणि कॉंग्रेसच्या आघाडीला 76 जागा जिंकता आल्या. आणि यावेळी पश्चिम बंगालमध्ये आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा फक्त 3 चं जागांवर विजय मिळवत समाधान मानाव लागलं होत. बाकी 4 जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या भाजपा विधानसभा निवडणुकीत जोर लावताना दिसत आहे. आसाममधील 126 जागांवर निवडणुका: 2016 मध्ये 86 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. कांग्रेसला 26 जागा आणि AIUDF ला 13 जागा मिळाल्या होत्या. इतरांकडे 1 जागा होती. तामिळनाडूमधील 234 जागांवर निवडणुका: 134 जागा जिंकून AIDMK आघाडीने सरकार स्थापन केलं होतं. DMK आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या. पुडुचेरीच्या 30 जागांवर निवडणूका: पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 30 जागा आहेत. इथे विधानसभेत 3 नामित सदस्य असतात. आतापर्यंत इथे काँग्रेस आघाडीचे सरकार होते परंतु गेल्याच आठवड्यात काही आमदारांनी काँग्रेस सोडल्यामुळे हे सरकार अल्पसंख्याक झाले. त्यामुळे सध्या इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. केरळमधील 140 जागांवर निवडणूका: डाव्या पक्षांचा शेवटचा गड असलेल्या केरळमध्ये 140 जागांवर निवडणुका होणार आहे. इथे डावे पक्ष आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. डाव्यांकडे 91 आणि काँग्रेसच्या यात 47 जागा आहेत. भाजपा आणि इतरांच्या खात्यात 1 - 1 जागा आहे.#WATCH LIVE: Election Commission of India announces poll schedule for 4 States, 1 UT https://t.co/ARX0jAnE6s
— ANI (@ANI) February 26, 2021
अवश्य वाचा - '25 वर्ष विचार केला नाही पण आता राजकारणात येणार,' रॉबर्ट वाड्रांची घोषणा
केंद्रीय दलाच्या 250 तुकड्या तैनात : दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाबरोबर झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने अर्धसैनिक सैन्य दलाच्या 250 कंपन्यांची 5 निवडणूक राज्यांमध्ये तैनाती सुरू केली आहे. या कंपन्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा डाळ, सीमा सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील 125 कंपन्यांना मध्यवर्ती दलात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये 65, आसाममध्ये 70, पुडुचेरीमध्ये 10 आणि केरळ मध्ये 30 कंपन्या तैनात केल्या आहेत.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Election, Election commission, Kerala, Tamil nadu, West bengal